Type Here to Get Search Results !

एकुर्गा येथील माजी सरपंच दिनकर इंगळे व बालकृष्ण अडसूळ यांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भाजपात जाहीर प्रवेश

लातूर/ अंबादास करकरे 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या विविध विकासकामांना प्रेरित होऊन आणि आमदार रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लातूर तालुक्यातील मौजे एकुर्गा येथील माजी सरपंच दिनकर इंगळे व बालकृष्ण अडसूळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश संपन्न झाला. यावेळी लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष बन्सी भिसे, लालासाहेब पाटील, विजय काळे, सुनील पाटील, लक्ष्मीकांत घुटे, दत्ता सप्काळ, राम गाडे, अ‍ॅड. धनराज शिंदे, बालाजी गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावागावात आणि वाडी-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सामाजिक सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. या विकासकामांमुळे प्रेरित होऊन एकुर्गा येथील माजी सरपंच दिनकर इंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब रोडके यांच्यासह अमर इंगळे, तानाजी शिंदे, शत्रुघन गोरडे, संजय मोरे, प्रभावती इंगळे आणि बालकृष्ण अडसूळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार रमेशआप्पा कराड यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपात झालेल्या या प्रवेशामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात पक्ष संघटन अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला नवे बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.




Post a Comment

0 Comments