Type Here to Get Search Results !

भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांच्यासह अनेकांचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल



लातूर/अंबादास करकरे 

लातूर जिल्हा परिषद व रेणापूर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सुरू असून, भाजपाच्या युवा नेतृत्वाने आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटातून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

याच वेळी कामखेडा जिल्हा परिषद गटातून सौ. सरिता शंकरराव भिसे, खरोळा जिल्हा परिषद गटातून सौ. शिवकन्या महेंद्र गोडभरले तसेच पोहरेगाव जिल्हा परिषद गटातून सौ. मनीषा दशरथ सरवदे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय पंचायत समिती गणातील अनेक उमेदवारांनी बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी रेणापूर येथील तहसील कार्यालयात अर्ज सादर केले.

लातूर जिल्हा परिषद व रेणापूर पंचायत समितीसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भाजपाचे नेते तथा आमदार रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सर्व गटांमध्ये सक्षम व अनुभवी उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

पानगाव जिल्हा परिषद गटातून ऋषिकेशदादा कराड, पानगाव पंचायत समिती गणातून सौ. रंजना मारुती गालफाडे, कोष्टगाव पंचायत समिती गणातून सौ. जयश्री संजय डोंगरे, कामखेडा पंचायत समिती गणातून शरद दरेकर, मोटेगाव पंचायत समिती गणातून संतोष चव्हाण, खरोळा पंचायत समिती गणातून सौ. शितल प्रताप राऊतराव, कारेपूर पंचायत समिती गणातून सौ. अंजली राजेश काळे, पोहरेगाव पंचायत समिती गणातून आकाश भुतके तसेच निवाडा पंचायत समिती गणातून विष्णू गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजपाचे माजी आमदार अॅड. त्र्यंबकनाना भिसे, ज्येष्ठ नेते ओमप्रकाश गोडभरले, राजेश कराड, व्यंकटराव अनामेमामा, शंकरराव भिसे, अनंत चव्हाण, नवनाथ भोसले, अनिल भिसे, सतीश आंबेकर, सुकेश भंडारे, दशरथ सरवदे, महेंद्र गोडभरले, अभिषेक आकनगिरे, विजय गंभीरे, अॅड. मनोज कराड, सुनील चेवले, रवींद्र नागरगोजे, नामदेव बोंबडे, राम मोरे, तेजस कराड यांच्यासह असंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण होते. “विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध आहेत,” असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या संघटनशक्तीचे आणि जनाधाराचे प्रभावी दर्शन या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेतून घडले.

Post a Comment

0 Comments