Type Here to Get Search Results !

उदगीर ग्रामीण पोलिसांची घरफोडी प्रकरणात धडक कारवाई; कार व रोकडसह २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


अंबादास करकरे 

लातूर, दि. २३ जानेवारी २०२६ 

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत पोलिसांनी आरोपीस अटक करून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली कार व घरफोडीतून चोरलेली रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी नामेेश भुजारंग बिरादार (वय ६४, व्यवसाय – शेती, रा. दैठाणा, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरफोडी करत रोकड व इतर मौल्यवान साहित्य चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद होते. या प्रकरणी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(२), ३०५(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भाटले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सक्रिय करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांची माहिती व तपासाअंती पोलिसांनी जनकिशोर जनकराम लांडे (वय ३२, रा. लांडे तांडा, ता. जळकोट, जि. लातूर) यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून मारुती इर्टिगा कार (MH-24-9355) ज्याची किंमत अंदाजे २,००,००० रुपये तसेच घरफोडीतून चोरलेली ९०,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २,९०,००० रुपये आहे. सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार राम बनसोडे, पोलीस हवालदार सचिन केंद्रे, पो.ना. रवी चव्हाण, पो.ना.  नामदेव चव्हाण, पो.अं. राजकुमार खेडकर, पो.अं. सचिन नाडगुडे तसेच सायबर सेल लातूर पोलीस ठाणे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे हे करीत करत आहे.

Post a Comment

0 Comments