Type Here to Get Search Results !

उदगीर ग्रामीण पोलिसांची डी.बी. पथकाची कारवाई चोरीस गेलेली ६० हजारांची मोटारसायकल जप्त एक आरोपी अटकेत!

 


उदगीर/अंबादास करकरे 

उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात डी.बी. पथकाने प्रभावी कारवाई करत चोरीस गेलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली असून या प्रकरणात एक आरोपी अटकेत घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी नितीन गुरुनाथ मिरजगावे (वय ४६, व्यवसाय – शेती, रा. विकास नगर, देगलूर रोड, उदगीर) यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक ७३२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.

तपासादरम्यान डी.बी. पथकातील पोलीस हवालदार राम बनसोडे संदीप केंद्रे,  नामदेव चेवले,  राजकुमार डबेटवार, सचिन नाडगुडे व राजकुमार देवडे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला.

दरम्यान संशयित आरोपी इसराफन इस्माईल मणियार (वय ३१, रा. नळगीर, ता. उदगीर, जि. लातूर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-24 AR 8385), अंदाजे किंमत ₹६०,०००/-, जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments