Type Here to Get Search Results !

भातांगळी गटात भाजपाला मताधिक्य द्या; एकही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही – आ. रमेशआप्पा कराड भातांगळी, ममदापूर, बोरी, मुशिराबाद येथील प्रचार बैठकींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद





अंबादास करकरे 

लातूर, दि. ३० : लातूर ग्रामीण मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला मोठे समर्थन मिळत असून भातांगळी जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन करत या गटातील कोणत्याही गावातील विकासाचे एकही काम शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही भाजपाचे नेते तथा आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली. भातांगळी, ममदापूर, बोरी आणि मुशिराबाद येथे आयोजित प्रचार बैठकींना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भातांगळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार महादेव गुलाब साळुंके, भातांगळी पंचायत समिती गणाचे उमेदवार पांडुरंग अशोक बालवाड तसेच बोरी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. सिंधुबाई राजेंद्र खुरदळे यांच्या प्रचारार्थ आ. कराड यांनी विविध ठिकाणी बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, मंडल अध्यक्ष प्रताप पाटील, गोविंद नरहारे, विजयकुमार मलवाडे, वाजिद पटेल, सतीश बिराजदार, संजय ठाकूर, सुरेश पाटील, हनुमंत गव्हाणे, आदिनाथ मुळे, मारुती शिंदे, व्यंकट जटाळ, सुरेखा पुरी, रुपेश काळे, विष्णू कारवाडे, विशाल वंगवाडे, रमाकांत पाटील, चंद्रकांत पासमे, दत्तू वंगवाड, पद्माकर शिंदे, ज्ञानोबा शेळके, गणेश पासमे, राजू पासमे, महेश शिंदे, पांडुरंग कदम, अहमद शेख, अशोक बिराजदार, सुरेश हंगरगे, लिंबराज बोळंगे, विठ्ठल जटाळ, नागनाथ विटेकर, पुंडलिक बेंबडे, प्रल्हाद अनंतवाड, अशोक इंगळे, बजरंग पाटील, साहिल सुळे, ऋषिकेश ईगे, मयूर मलवाडे, भागवत बोयने, प्रदीप चित्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रत्येक बैठकीला मोठी गर्दी झाली असून गावातील विविध अडचणी सोडविण्यात आमदार कराड यांचे योगदान असल्याचे मतदारांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती मिळाली असून शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान, ममदापूर येथील महेश सुरवसे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

आमदार झाल्यानंतर प्रत्येक गावात शक्य ते सर्व विकासकामे करण्याचा तसेच गरजू व पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आ. कराड यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीही भाजपाच्याच ताब्यात यायला हव्यात, असे त्यांनी नमूद केले. भातांगळी गटातून मोठे समर्थन मिळाल्यास या भागाला सभापतीपदाचा मान मिळू शकतो, असेही त्यांनी सूचित केले.

“ऊसाच्या टिपऱ्याचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. साखर कारखाने हे कोणाचीही जहागिरी नसून शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत,” असे ठाम मत व्यक्त करत येत्या वर्षभरात प्रत्येक गावातील शेतरस्ते व पांदण रस्ते मजबूत करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची गैरसोय लवकरच दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येत्या ७ फेब्रुवारी रोजी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भातांगळी गटातील तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आ. रमेशआप्पा कराड यांनी ठिकठिकाणी झालेल्या प्रचार सभांमधून केले.

Post a Comment

0 Comments