लातूर/अंबादास करकरे
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वच जागांवर सक्षम, प्रभावी आणि लोकविश्वास असलेले उमेदवार देण्यात आले असून, मतदारसंघात आजवर करण्यात आलेल्या भरीव विकासकामांच्या जोरावर भाजपाचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील. तसेच रेणापूरसह लातूर पंचायत समितीवर भाजपाचाच झेंडा फडकेल, असा ठाम आत्मविश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागाच्या विकासाचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी, आमदार रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांसाठी भाजपाकडून पुढीलप्रमाणे उमेदवारी देण्यात आली आहे :
काटगाव जिप गटातून सौ. पूर्वादेवी नाथसिंह देशमुख, काटगाव पंस गणातून सौ. शितल दत्ता लटपटे, गातेगाव पंस गणातून समाधान जगन्नाथ पवार, मुरुड जिप गटातून सौ. रंजना बळीराम हिंगले, मुरुड–१ पंस गणातून उद्धव सूर्यभान चव्हाण, मुरुड–२ पंस गणातून सौ. मनिषा सचिन देवकर, एकुर्गा जिप गटातून साहेबराव ज्ञानोबा मुळे, एकुर्गा पंस गणातून सौ. स्वाती किशोर घुटे, अंकुली पंस गणातून संजय श्रीमंत सूर्यवंशी, तांदूळजा जिप गटातून दिपक भागवत वांगसकर, तांदूळजा पंस गणातून सौ. सुचिता अंकुश गणगे, गाधवड पंस गणातून बाबासाहेब साहेबराव भिसे, निवळी जिप गटातून कु. मयुरी श्रीराम आदमाने, निवळी पंस गणातून सूर्यकांत भिवा सोनवणे, चिंचोली (बु.) पंस गणातून सौ. रेखा श्रीकांत देशमाने, भातांगळी जिप गटातून महादेव गुलाब साळुंके, भातांगळी पंस गणातून पांडुरंग अशोक बालवाड, बोरी पंस गणातून सिंदूबाई राजेंद्र खुरदळे, पानगाव जिप गटातून सतीश रावसाहेब आंबेकर, पानगाव पंस गणातून रंजना मारुती गालफाडे, कोष्टगाव पंस गणातून सौ. जयश्री संजय डोंगरे, कामखेडा जिप गटातून सौ. सरिताताई शंकरराव भिसे, कामखेडा पंस गणातून शरद माणिकराव दरेकर, मोटेगाव पंस गणातून संतोष मुरलीधर चव्हाण, खरोळा जिप गटातून शिवकन्या महेंद्र गोडभरले, खरोळा पंस गणातून सौ. शितल प्रताप राऊतराव, कारेपूर पंस गणातून अंजली राजेश काळे, पोहरेगाव जिप गटातून सौ. मनिषा दशरथ सरवदे, पोहरेगाव पंस गणातून आकाश राजेंद्र भुतके, निवाडा पंस गणातून विष्णू सोपानराव गोरे, भादा जिप गटातून सौ. छाया पदमाकर चिंचोलकर, भादा पंस गणातून बळीराम काकासाहेब साळुंके, बोरफळ पंस गणातून भाग्यश्री कृष्णा साळुंके यांचा समावेश आहे.
तसेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काही गावे इतर जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात समाविष्ट असून, त्या ठिकाणीही भाजपाने सक्षम उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये महाराणा प्रताप नगर जिप गटातून सोमनाथ विठ्ठल वाघमारे, महाराणा प्रताप नगर पंस गणातून सौ. रेशमा अतुल होळकर, बाभळगाव पंस गणातून सौ. रजनीगंधा संजय अडसूळ, हरंगुळ (बु.) जिप गटातून सौ. सरिता रवींद्र काळदाते, हरंगुळ (बु.) पंस गणातून प्रशांत नागनाथ खोबरे, हरंगुळ (खु.) पंस गणातून किरण सुरेश रोंगे, आर्वी जिप गटातून वैशाली चंद्रकांत लोंढे, आर्वी पंस गणातून सौ. विजया उदय गोजमगुंडे, महापूर पंस गणातून माणिक निवृत्ती आलुरे, पाखरसांगवी जिप गटातून सौ. अश्विनी बाबू खंदाडे, पाखरसांगवी पंस गणातून उमेश सिद्धेश्वर हंडरगुळे, गंगापूर पंस गणातून सौ. तनुजा धीरज पाटील, शिवली पंस गणातून सौ. प्रणिता राजकिरण साठे आणि तुंगी पंस गणातून परमेश्वर श्रीमंत लांडगे यांचा समावेश आहे.
यावेळी आमदार रमेशआप्पा कराड म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावागावात, वाडी-वस्त्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आदी विविध विकासकामे प्रभावीपणे राबविण्यात आली आहेत. या कामांमुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भाजपाबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
आगामी निवडणुकीत भाजपाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार बहुमताने विजयी होतील आणि रेणापूरसह लातूर पंचायत समिती भाजपच्या ताब्यात येईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत आमदार कराड यांनी पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिद्दीने, जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments