Type Here to Get Search Results !

लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन सहाय्यक दुय्यम निरीक्षकांना पदोन्नती.

 


लातूर | अंबादास करकरे 

लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन सहाय्यक दुय्यम निरीक्षकांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार गणेश गोले, एकनाथ फडणीस आणि सुरेश गोविंद काळे यांची दुय्यम निरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर दि. १ एप्रिल २०२६ रोजी लातूर येथे आयोजित कार्यक्रमात विभागाचे अधीक्षक केशव गो. राऊत यांच्या हस्ते तिन्ही अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पदोन्नतीनंतर गणेश गोले यांची सीमा तपासणी नाका, मंद्रप (नांदणी), जि. सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ फडणीस यांना भरारी पथक, नांदेड येथे तर सुरेश काळे यांची मे. पायोनिअर डिस्टिलरी, नांदेड येथे पदस्थापना करण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील तोंडार (ता. उदगीर) येथील विलास सहकारी साखर कारखाना आसवणी विभागात व्ही. टी. खिल्लारे यांनी दुय्यम निरीक्षक म्हणून रुजू केले आहे.

सत्कार सोहळ्यात अधीक्षक केशव राऊत व उपअधीक्षक मारोती मुपडे यांनी पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कारमूर्ती गणेश गोले यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक दुय्यम निरीक्षक मंगेश खारकर यांनी केले.

या कार्यक्रमास विभागातील निरीक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये आर. एस. कोतवाल, वि. ओ. मनाळे, आर. व्ही. कडवे, श्रीमती यु. व्ही. मिसाळ, आर. डी. भोसले, एन. टी. रोटे, एस. आर. राठोड, बी. आर. वाघमोडे, आर. एम. माकोडे, जी. व्ही. साळवे, बी. एल. येळे, एस. डी. घुले, एस. पी. काळे, बी. एच. आशमोड, विजय पवार, चे. मा. खारोडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहात पार पडला असून पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments