Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल अर्जुन (भाऊ) रजपूत यांचा वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न




लातूर/अंबादास करकरे 

लातूर : स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) हेड कॉन्स्टेबल तथा सर्वांचे जिवलग श्री. अर्जुन (भाऊ) रजपूत यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती व गृहप्रवेशाचा मंगल सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला.

या शुभ प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांनी नव्या घरासाठी शुभेच्छा देत राजपूत कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.

यावेळी करकरे परिवारातर्फे श्री. अर्जुन (भाऊ) रजपूत यांना नव्या घरासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. “नवीन वास्तूमध्ये सुख, समृद्धी आणि आनंद नांदो,” अशा भावना व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

सदर सोहळा आपुलकी, आनंद आणि एकोप्याचे प्रतीक ठरला असून उपस्थित सर्वांनी या आनंदोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

Post a Comment

0 Comments