उदगीर/अंबादास करकरे
उदगीर येथील नांदेड–बिदर रोडवरील तोंडार पाटी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या *‘हॉटेल रेड्डीज विला’*चा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. या हॉटेलचे उद्घाटन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले असून, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
हॉटेलचे संचालक अभिजीत पस्तापुरे रेड्डी यांनी दिलेल्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देत प्रमुख पाहुणे आणि उद्घघाटक आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी अभिजीत रेड्डी यांचे नवीन व्यवसायासाठी मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, “उदगीर शहर झपाट्याने विकसित होत आहे. अशा वेळी आधुनिक सुविधा असलेली हॉटेल्स उभारली जाणे ही सकारात्मक बाब आहे. हॉटेल रेड्डीज विला ग्राहकांना उत्कृष्ट सेवा, दर्जेदार भोजन आणि समाधानकारक अनुभव देणारे ठिकाण ठरेल,” असा विश्वास आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात परिसरातील विविध मान्यवर, व्यापारी, मित्रपरिवार आणि नागरिक उपस्थित होते. उद्घाटनानंतर पाहुण्यांनी हॉटेलची पाहणी करून सुविधांची माहिती घेतली तसेच भोजनाचा आस्वादही घेतला.
नवीन व्यवसायामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, उदगीरच्या व्यावसायिक विकासातही या हॉटेलचा मोलाचा वाटा राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Post a Comment
0 Comments