लातूर/रेणापूर
अंबादास करकरे
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज सकाळी भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा ताबा अचानक सुटला. वेगात असलेली कार नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते गाडीत एकटेच असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. राकेश गिड्डे यांच्या अकाली निधनामुळे प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments