लातूर/ अंबादास करकरे
रविवारी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या मेळाव्यास शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे आणि अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष नाझीर काजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, तसेच प्रदेश सरचिटणीस ऍड. व्यंकटराव बेदरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान अल्पसंख्याक विभागाचा आढावा घेण्यात आला. पक्ष मजबूत करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष नाझीर काजी यांनी स्पष्टपणे सांगितले की,
अजितदादा पवार यांच्या पश्चात आता पक्षासाठी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांनी फोनद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढीसाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय समारोप करताना आमदार विक्रम काळे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अल्पसंख्याकांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या निर्णयांमुळेच अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

Post a Comment
0 Comments