Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नवनियुक्त जि.प. पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार




लातूर/ अंबादास करकरे 

लातूर ग्रामीण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये जि.प. उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले सन्माननीय दयानंदजी सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार तसेच समाज कल्याण सभापती उत्तमराव माने यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर ग्रामीणचे तालुका अध्यक्ष शिवराज मुळे, लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष धनंजय मरे, तालुका कार्याध्यक्ष परमेश्वर पर्वते, युवक विधानसभा अध्यक्ष सचिन मेटे, तालुका उपाध्यक्ष नितीन मोरे, युवक कार्याध्यक्ष तनपुरे, महादेव मस्के, प्रशांतजी गोबे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करून जिल्ह्याच्या प्रगतीस हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले.

सत्काराला प्रतिसाद देताना मान्यवरांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करत विकासाभिमुख कामकाज करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments