Type Here to Get Search Results !

आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन २९ मे रोजी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन; ३० मे रोजी अभिष्टचिंतन सोहळा



अंबादास करकरे 

लातूर, दि. २९: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्त २९ व ३० मे रोजी विविध धार्मिक, सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार रमेशअप्पा कराड यांचा ३० मे रोजी वाढदिवस असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, २९ मे रोजी प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

औसा तालुक्यातील भादा सर्कल अंतर्गत मौजे समदर्गा येथे सायंकाळी ७ वाजता हा कीर्तन सोहळा पार पडणार असून, परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराजांचे कीर्तन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

तसेच ३० मे रोजी आमदार रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांमध्ये ग्रामदैवतांच्या मंदिरात महापूजा, अभिषेक व विशेष प्रार्थना करण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार कराड यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

यासोबतच रक्तदान शिबिरे, सामाजिक सेवा उपक्रम, गरजू नागरिकांना मदत, वृक्षारोपण तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, वाढदिवस समाजहिताच्या कार्यातून साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर ग्रामीण मतदारसंघात विकासकामांना गती मिळाली असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments