लातूर/अंबादास करकरे
आपल्या कार्यतत्परतेने, प्रामाणिकपणाने आणि कर्तव्यदक्षतेने प्रशासनात वेगळी ओळख निर्माण करणारे गोपी साठे यांची महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सामाजिक कार्यकर्ते मयूर बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गोपी साठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणविरोधी कारवाई प्रभावीपणे राबविणे, शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आणि नागरिकांना सुकर व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या दृष्टीने गोपी साठे यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सत्कार प्रसंगी मयूर बनसोडे म्हणाले की, “गोपी साठे यांनी आतापर्यंत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला निश्चितच होईल. शहर विकासाच्या दृष्टीने ते प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास आहे.”
यावेळी गोपी साठे यांनीही दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना नागरिकांच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण समस्या सोडविण्यासाठी पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची ग्वाही दिली.
या सत्कार कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी गोपी साठे यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.


Post a Comment
0 Comments