अंबादास करकरे
लातूर, दि. २२ : खंडापूर (ता. लातूर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण व संतांच्या पादुका दर्शन उत्सव सोहळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समितीच्या वतीने दि. २७ व २८ मे २०२६ रोजी गांधी चौक, लातूर येथे दोन दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
समितीच्या निवेदनानुसार, संबंधित सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी गोळा करण्यात आली होती. तथाकथित महाराज किशोर जाधव शिवणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमा झालेल्या निधीचा अपहार करून कोणताही हिशोब न देता फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सोहळ्यात संतांच्या बनावट पादुका दर्शनासाठी ठेवल्याचा आरोप करत भाविकांच्या श्रद्धेशी खेळ करण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी समितीने केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शासन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे उपोषण दि. २७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होऊन दि. २८ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत चालणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. “सर्वसामान्य भाविक व नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” या उद्देशाने सर्व सुजाण नागरिक, वारकरी व भाविकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनात महाराज कदम, ज्ञानोबा बडगिरे, मुंह से मैकले, निलेश महाराज किल्लारीकर, सुनील कावळे, संदिपान बडगिरे, दिलीप महाराज बलसे, चंद्रकांत आरडले, भूषण महाराज तळणीकर, शाम बरसे, डॉ. गणेश गोमारे, अरुणभेख्या आकडे, कैलास महाराज मदे, महेश चामे, रामकृष्ण महाराज गोविंदनगर, तुषार लखनगिरे, अरुण शिंदे, शाम जैन, नारायण मुंडे, रविराज मुल्कुळे, विनायक चव्हाण, गुलनार गोळी, कांका बोके, बाबा महाराज बोराडे, दिलीप तळवाडे, माऊली सुदे, विष्णु महाराज कोळी, गणेश महाराज सोनवणे, पांडुरंग महाराज समयणकर, विनायक महाराज शुगीसांगाली, विल महाराज कोळी, बाळक जी सगाव, बळ भीमठ छकीकर, कदीप महाराज शिरकर व नितीन महाराज हिपरगेकर आदींचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments