Type Here to Get Search Results !

संत शिरोमणी श्री मारुती महाराज मार्ग’ रुंदीकरण व सुधारणा कामास १७ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे


अंबादास करकरे 
लातूर : औसा मतदारसंघाच्या दळणवळण व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून ‘संत शिरोमणी श्री मारुती महाराज मार्ग’ रुंदीकरण व सुधारणा कामास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे औसा मतदारसंघातील रस्ते जाळे अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक होणार असून नागरिकांसह शेतकरी, व्यापारी व उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत दोन प्रमुख मार्गांचे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार रुंदीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मार्ग क्रमांक १ मध्ये मांजरा कारखाना जवळील बार्शी रोड रेल्वे जंक्शन (लातूर) – आलमला – औसा – नागरसोगा – पोमादेवी जवळगा – हरेगाव – लिंबाळा दाऊ – गुबाळ – सास्तूर या ४० किलोमीटर राज्य मार्गाचा समावेश आहे. तर मार्ग क्रमांक २ मध्ये हसलगन – संक्राळ – पोमादेवी जवळगा – चिंचोली तपसे – लामजना – NH 548 (B) या २० किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ६० किलोमीटर रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होणार आहे.
या रस्ते प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार असून वाहतूक सुलभ, जलद व सुरक्षित होईल. शेतीमालाची वाहतूक, व्यापार, शिक्षण, आरोग्य व उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच औसा मतदारसंघाच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या मंजुरीबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे आभार मानले आहेत. “औसा मतदारसंघाच्या विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. हा प्रकल्प मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments