लातूर अंबादास करकरे
लातूर येथे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या संवाद कार्यालयास महायुतीचे उमेदवार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना बसवराज पाटील मुरूमकर यांनी जिल्ह्यातील शहरांसोबतच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देणार असून विकासाचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.
ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील रमेशआप्पा कराड, संभाजीभैय्या पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार हे तिन्ही आमदार कार्यक्षमतेने काम करत असून भविष्यात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी आमदार रमेशआप्पा कराड यांनी बसवराज पाटील यांचा विजय विक्रमी मताधिक्याने होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षाकडून सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास विक्रमकाका शिंदे, नाथसिंह देशमुख, भागवत सोट, प्रा. बी.बी. मोतीपवळे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments