Type Here to Get Search Results !

तांदुळजा खुल्या क्रिकेट स्पर्धेतील आमदार चषक तिरंगा क्रिकेट क्लब मसला संघाने पटकावला यशस्वी संघांना आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण


अंबादास करकरे 

लातूर, दि. ११ : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्त तांदुळजा (ता. लातूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतला असून अंतिम फेरीत दमदार खेळ करत तिरंगा क्रिकेट क्लब, मसला संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेतील विजेत्या तसेच उपविजेत्या संघांचा गौरव लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आमदार रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजेत्या संघांना रोख पारितोषिक, आकर्षक चषक, पदके आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संगायो समितीचे अध्यक्ष बन्सी भिसे, भाजपाचे मंडल अध्यक्ष प्रताप पाटील, सुरज शिंदे, अशोक सावंत, भैरवनाथ पिसाळ, बाबा भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार कराड यांनी स्पर्धेतील खेळाडूंचे कौतुक करत ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक तिरंगा क्रिकेट क्लब, मसला संघाने पटकावत ₹३१ हजारांचे रोख पारितोषिक व चषक जिंकला. द्वितीय क्रमांक श्री गणेशा क्रिकेट क्लब, कानडी बोरगाव संघाने मिळवत ₹२१ हजारांचे पारितोषिक व चषक पटकावला, तर तृतीय क्रमांक कॉमन वेल्थ क्रिकेट क्लब, बोरडा संघाने मिळवत ₹११ हजारांचे पारितोषिक व चषक जिंकला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये राहुल राठोड यांना मॅन ऑफ द सिरीज, समाधान सोनटक्के यांना मॅन ऑफ द मॅच आणि विजय आल्टे यांना बेस्ट विकेटकीपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अंकुश गणगे, संतोष गायकवाड, नरेंद्र आल्टे, रामहरी भिसे, सचिन कांबळे, नुरखॉ पठाण, विष्णू कसबे, बाबा नवगिरे, बिभीषण शिंदे, शैलेश कसबे यांच्यासह विजयी तिन्ही संघांचे खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे परिसरातील युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली.

Post a Comment

0 Comments