Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन


देवणी | प्रतिनिधी

राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, देवणी तालुक्याच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे देवणी तालुका अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी प्रशासनाने लोकहिताच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे व वेळेत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.

निवेदन सादर करताना राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे देवणी तालुका अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्यासह उदगीर तालुका अध्यक्ष राजकुमार भंडे, मारुती भंडे, विठ्ठलराव बनसोडे, आतिक भाई शेख, साजिद पठाण तसेच तालुक्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments